कथा, कविता स्पर्धेत अवंती कोटे, यतिन फाटक प्रथम
पणजी : गोमंतकीय कथालेखकांना उत्तेजन देण्याच्या हेतूने गोवा मराठी अकादमीने कथा व कविता लेखन स्पर्धा आयोजित केली होती. कथा स्पर्धेत प्रथम पारितोषिक ६००० रुपये अवंती धनेश कोटे यांच्या ‘नवा बहर’ या कथेला प्राप्त झाले, तर खुल्या गटात काव्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. ५००० यतिन वल्लभ फाटक यांच्या ‘फॅन’ या कवितेला जाहीर झाले आहे.
कथा स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक ४००० रुपये पूजा मनोज सावंत बांदेकर यांच्या ‘दत्तू’ या कथेला, तर तृतीय पारितोषिक ३००० रुपये विठ्ठल नागेश गावडे पारवाडकर यांच्या ‘दैवगतीचा फेरा’ या कथेला प्राप्त झाले आहे.
काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक रु. ३००० चित्रा क्षीरसागर यांच्या ‘बाया’ या कवितेला, तृतीय पारितोषिक रु. २००० अवंती धनेश कोटे यांच्या ‘विलक्षण सानुली’ या कवितेला, उत्तेजनार्थ एक पारितोषिक रु. १००० तेजा वि. मळेकर-आरोंदेकर यांच्या ‘झोपडी’ या कवितेला, तर उत्तेजनार्थ दोन रु. १००० पारितोषिक सिद्धेश लक्ष्मण बापट यांच्या ‘येता बदलाचे वारे’ या कवितेला प्राप्त झाली आहेत.
उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन गटात प्रथम पारितोषिक रु. ३००० सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मानसी संजय शेटमांद्रेकर हिच्या ‘संरक्षण’ या कवितेला, द्वितीय पारितोषिक रु. २५०० सी.ई.एस. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची सलोनी उपेंद्र फळदेसाई हिच्या ‘जैत’ या कवितेला, तृतीय पारितोषिक रु. २००० सी.ई.एस. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची अनामिका सावंत हिच्या ‘चहा आणि बरंच काही...’ या कवितेला, चौथे पारितोषिक रु. १५०० विद्या प्रबोधिनी बी.एड. महाविद्यालयाची मिताली मुकूंद गावडे हिच्या ‘पहिले किरण आई’ या कवितेला, पाचवे पारितोषिक रु. १००० श्री शांतादुर्गा उच्च मा. विद्यालयाचा मिनेश मनोज चणेकर याच्या ‘खिडकीवरची चिमणी’ या कवितेला, सहावे पारितोषिक रु. ५०० शासकीय महाविद्यालय कला, विज्ञान आणि वाणिज्य केपेच्या स्वराली प्रमोद टेंग्से हिच्या ‘अंतरपाटाच्या पलीकडे’ या कवितेला प्राप्त झाली आहेत.
कथा स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत म. गावस व प्रा. डॉ. प्रमदा देसाई यांनी, तर कविता स्पर्धेचे परीक्षण रेखा वि. ठाकूर व डॉ. अनुजा जोशी यांनी केले.