धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणः जखमी अल्पवयीन विद्यार्थी व्हेंटिलेटरवर

गोमेकॉत प्लास्टिक सर्जरी; वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणः जखमी अल्पवयीन विद्यार्थी व्हेंटिलेटरवर

पणजी : ॲसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अल्पवयीन विद्यार्थी अद्याप वेंटीलेटरवरच असून तो  उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली आहे.


डॉ. युरी डायस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक त्याच्यावरील उपचार करत असून प्रकृतीबाबत दक्षता घेतली जात आहे, असेही डॉ. राजेश पाटील म्हणाले. तो शुद्धीत आलेला असला तरी अद्याप बोलण्याच्या अवस्थेत नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील उपचार करण्यात येतील, अशी माहिती डॉक्टरांकडून मिळाली.

धारगळ येथे एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर सोमवारी सकाळी ॲसिड फेकण्यात आले होते. पोलिसांनी काही तासातच संशयित नीलेश गजानन देसाई (कळणे - दोडामार्ग) याला अटक करून पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

दरम्यान गंभीर अवस्थेत असलेल्या त्या अल्पवयीन विद्यार्थ्याला प्राथमिक उपचारासाठी म्हापसा जिल्हा हॉस्पिटलात आणि नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून त्याचे डोळे, गाल, नाक भाजले असल्याने तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.

हेही वाचा