पणजी बाजारात टोमॅटो पुन्हा ‘पन्नाशी’त

कांदा, बटाटा ४० रुपये किलो : टोमॅटो, कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
पणजी बाजारात टोमॅटो पुन्हा ‘पन्नाशी’त

पणजी : कर्नाटक व महाराष्ट्रातून येणारी आवक कमी झाल्यामुळे पणजी बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी बाजारात टोमॅटोने पुन्हा पन्नाशी गाठली, तर कांदा आणि बटाटा ४० रुपये किलो होते. फ्लॉवर ६० रुपये, तर कोबी ५० रुपयेला एक होता. वालपापडी १६० रुपये, मिरची आणि ढब्बू मिरची १०० ते १२० रुपये किलो दराने विकले जात होते. पुढील काही दिवसांत टोमॅटो आणि कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत अन्य भाज्यांचे दर स्थिर होते. मेथी ३० रुपये, तर शेपू २५ रुपये जुडी होती. पालक, तांबडी भाजीची एक जुडी प्रत्येकी २० रुपये होती. गवारी १०० रुपये, शेवगा १६० रुपये किलो होता. लहान वांगी ६०, तर मोठी वांगी ८० रुपये किलो होती. गाजर, बीट ८० रुपये, तर काकडी ६० रुपये किलो झाले. दोडका आणि कारले ८० ते १०० रुपये, तर भेंडी ८० रुपये किलो होती. दुधी भोपळा ५० रुपयेला नग होता.

पणजी बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीस उपलब्ध आहेत. सध्या बाजारात तोतापुरी, नीलम, मल्लिका, दशेरी, हापूस, पायरी, केसर, मांगीलाल असे आंबे विक्रीस आले आहेत. हे आंबे १०० ते २०० रुपये किलो दराने विकले जात होते.

सोमवारी फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवर भेंडी ६२ रुपये, कोबी २५ रुपये, फ्लॉवर ३५ रुपये एक नग, गाजर ४० रुपये, वालपापडी ९८ रुपये, मिरची ४२, कांदा २८ रुपये, बटाटा ३३ रुपये, तर टोमॅटो २८ रुपये किलो होता.

पावसाळी भाज्या उपलब्ध

पणजी बाजारात अळूची पाने, तायकिळा, कुड्डुक या भाज्या दाखल झाल्या आहेत. अळूची पाने ५० रुपये, तायकिळा, कुड्डुक २० रुपये दराने विकले जात होते. सध्या या भाज्यांची आवक कमी असली, तरी त्यांना मागणी अधिक आहे. 

हेही वाचा