डीन डॉ. शिवानंद बांदेकर निवृत्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वयाची ६५ वर्षे झाल्यानंतर गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवेत मुदतवाढ मिळाली नसल्याने ज्येष्ठतेप्रमाणे मुत्रपिंड (किडनी) आजाराचे तज्ज्ञ डॉ. जयप्रकाश तिवारी नवे डीन होण्याची शक्यता आहे.
डीन म्हूण डॉ. बांदेकर यांचा सोमवारी शेवटचा दिवस होता. डॉ. बांदेकर यांची २०२१ मध्ये डीन म्हणून नियुक्ती झाली होती. डीन पदासाठी तीन नावांची चर्चा होती. त्यातून डॉ. बांदेकर यांनी नियुक्ती झाली. डीन होण्यापूर्वी ते ऑर्थोपेडिक विभागाचे मुख्य होते. सुपरस्पेशालिटी ब्लॉक सुरू करण्यासह अवयव प्रत्यारोपण (ऑर्गन ट्रान्सप्लान्ट) शस्त्रक्रिया सुरू करण्यात डॉ. बांदेकर यांचा मोलाचा वाटा आहे.