विधवा भगिनींसाठी आनंदवार्ता: पेन्शन रक्कम वाढली

मुलांचा जन्मदाखला तसेच इतर प्रमाणपत्रे अर्जासह करावी लागणार सादर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd July, 04:37 pm
विधवा भगिनींसाठी आनंदवार्ता: पेन्शन रक्कम वाढली

पणजी : दयानंद सामाजिक व गृह आधार मिळून विधवा भगिनींना आता महिन्याला ४ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. यासाठी विधवा भगिनीच्या (Widows) मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. यावेळी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

बऱ्याच महिला गृहआधार योजनेचा लाभ घेत असून पतीचे निधन झाल्यानंतर त्यांना गृहआधार योजनेचा लाभ बंद करण्यासाठी सोपस्कार करावे लागत होते. नवीन योजनेत विधवांना महिन्याला ४ हजार रुपयांची आर्थिक (pension) मदत दिली जाईल. यासाठी त्यांना मुलांचा जन्मदाखला तसेच इतर प्रमाणपत्रे अर्जासह समाज कल्याण खात्याला सादर करावी लागतील. यानंतर महिन्याकाठी आर्थिक मदत मिळण्यास सुरूवात होईल. 

सध्या विधवा भगिनींसाठी महिन्याला २५०० रुपयांची मदत मिळते. राज्यातील २०४९ विधवा भगिनींना याचा लाभ मिळतो. राज्यात ३६ हजार विधवा भगिनी असल्याची माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली

हेही वाचा