डिचोली : 'टाटा स्काय'चा अधिकारी असल्याचे भासवून गृहिणीला ४४ हजारांना गंडवले!

साखळी पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
डिचोली : 'टाटा स्काय'चा अधिकारी असल्याचे भासवून गृहिणीला ४४ हजारांना गंडवले!

पणजी : गोकुळवाडी-साखळी येथील एका गृहिणीला 'टाटा स्काय'चा अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साखळी पोलीस स्थानकात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय ? 

अनुषा वाडकर (४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते १९ जून रोजी सकाळी १०.४८ वाजेपर्यंत त्यांना ९१६३३०५९७० व ७८६५८७०३९४ या मोबाईल क्रमांकांवरून कॉल आले. फोनवरील व्यक्तीने स्वत:ला ‘टाटा स्काय’ कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून रिचार्ज प्रक्रियेच्या नावाखाली तक्रारदारांकडून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर फसवणूक करणाऱ्याने  बँक तपशीलाचा वापर करून तक्रारदारांच्या बँक खात्यातून एकूण ४४,३४०.७६ रुपये लुबाडले. यामुळे तक्रारदार अनुषा वाडकर यांना आर्थिक नुकसान झाले.

या प्रकरणी साखळी पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(३), ३१८(४), ३१९(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रश्मीर परब मातोंडकर करीत आहेत.




हेही वाचा