स्पाइसजेटच्या गोवा-पुणे विमानात उड्डाणादरम्यान खिडकीची फ्रेम निखळली; प्रवाशांत पसरली धास्ती

सुदैवाने टळला मोठा अपघात; विमान कंपनीची सारवासारव, म्हणाले- लँडिंगनंतर केली खिडकीच्या फ्रेमची दुरुस्ती.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
स्पाइसजेटच्या गोवा-पुणे विमानात उड्डाणादरम्यान खिडकीची फ्रेम निखळली; प्रवाशांत पसरली धास्ती

पुणे : स्पाइसजेटच्या गोवा-पुणे एसजी-1080 या फ्लाइटमध्ये उड्डाणादरम्यान गंभीर तांत्रिक त्रुटी समोर आली आहे. विमान हवेत असतानाच एका खिडकीची फ्रेम अचानक सैल झाली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि विमान पुणे विमानतळावर सुरक्षित उतरले.



या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक प्रवाशांनी आपल्या चिंता व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, स्पाइसजेटने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, प्रवाशांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि संपूर्ण प्रवासादरम्यान कॅबिनमधील दाब स्थिर होता. लँडिंगनंतर खिडकीच्या सैल झालेल्या फ्रेमची दुरुस्ती करण्यात आली आहे.


Panic Among SpiceJet Passengers After Window Frame Pops Out Mid-Air |  Odisha Bytes


प्रवाशाचा अनुभव :

या विमानातून प्रवास करणारे मंदार सावंत यांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणतात, मी गोव्यातून पुण्याकडे निघालो होतो. माझ्या मागच्या सीटवर एक महिला आपल्या लहान मुलासोबत बसली होती. उड्डाणाला साधारण अर्धा तास झाला असता अचानक खिडकीचे फ्रेम निखळले. ती महिला घाबरली. एअर होस्टेसने तिला आणि मुलाला तातडीने मागच्या सीटवर हलवले. त्यांनी परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुरुस्ती शक्य न झाल्यामुळे खिडकी तशीच सोडण्यात आली.


SpiceJet flight's window frame comes loose mid-air. How risky is that? –  Firstpost


 स्पाइसजेटची गोवा-पुणे एसजी-१०८० ही फ्लाइट १ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता नियोजित होती, मात्र ती तब्बल दीड तास उशिरा, संध्याकाळी ६.५५ वाजता निघाली. या विलंबामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली. काहींनी विमान कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 मंदार सावंत यांनी सांगितले की, विमानतळावर पोहोचल्यानंतरच आम्हाला उशिराची माहिती मिळाली. स्टाफकडून कळले की सदर फ्लाइट मागील दिवशीही ‘तांत्रिक अडचणींमुळे’ उशिरा निघाली होती. मात्र, याबाबत स्पाइसजेटकडून मला कोणताही मेसेज किंवा अपडेट मिळाला नव्हता.

या विलंबामुळे अनेक प्रवाशांचे अन्य नियोजित कार्यक्रम ढासळले. एखाद्या तांत्रिक अडचणीसाठी कंपनी जबाबदार नसली तरी प्रवाशांना वेळेत माहिती देणे आणि योग्य पर्याय देणेही अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. एयरलाइनकडून या विलंबाबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही. याबाबत देखील प्रवाशांत नाराजी पहायला मिळाली. त्यात खिडकी निखळण्याचा प्रसंग घडल्याने त्यांचा रागाचा पारावार उरला नाही. 


बीच हवा में घबराहट? स्पाइसजेट गोवा-पुणे फ्लाइट की खिड़की का फ्रेम लगभग बाहर  आ गया - देखें वीडियो


डीजीसीएने दिले चौकशीचे आदेश :

या प्रकरणी  अद्याप डीजीसीएचे  अधिकृत निवेदन समोर आले नसले तरी , सूत्रांच्या माहितीनुसार घटनेचे गांभीर्य पाहता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. स्पाइसजेटच्या Q400 प्रकारातील विमानांमध्ये यापूर्वीही देखभाल-संबंधित त्रुटी आढळून आल्यामुळे डीजीसीए त्यांच्यावर नजर ठेवून आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून डीजीसीएच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे.


हेही वाचा