मडगाव : नेसाय येथून गाईसह दोन वासरांची गोरक्षकांद्वारे सुटका

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 10:46 am
मडगाव :  नेसाय येथून गाईसह दोन वासरांची गोरक्षकांद्वारे सुटका

मडगाव : नेसाय फेज दोन परिसरात बेकायदेशीरपणे आणलेल्या एका गाईसह दोन वासरांची बजरंग दलाच्या गोवा विभागातील गोरक्षकांनी मायना-कुडतरी पोलिसांच्या मदतीने सुटका केली. सध्या या सर्व प्राण्यांना जांबावली येथील ध्यान फाउंडेशनच्या गोशाळेत हलवण्यात आले आहे.



'

मंगळवारी सायंकाळी उशिरा स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर गोरक्षकांनी नेसाय फेज दोन येथील एका घराजवळील मोकळ्या जागेत गाई व दोन वासरांना बांधून ठेवलेले पाहिले. गोरक्षक घटनास्थळी पोहोचताच, त्याच परिसरातील एका व्यक्तीने ही गुरे आपल्या घरात नेऊन ठेवली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गोरक्षकांनी मायना-कुडतरी पोलिसांना बोलावले.




पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने गुरे पेडणे येथून विकत घेतल्याचे सांगितले. मात्र, त्या व्यवहारासंबंधी कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. परिणामी, पोलिसांच्या उपस्थितीत गाई व वासरांची सुटका करण्यात आली. यापूर्वीही खारेबांध येथे कत्तलीसाठी आणलेल्या गाईंना बजरंग दलाच्या गोरक्षकांनी वाचवले होते.

हेही वाचा