पेडणे : जुनसवाडा मांद्रे येथील खाडीत बुडून एका नेपाळी व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला.
मांद्रे येथील एका हॉटेलमध्ये नेपाळ येथील रमेश खतायत नेपाळी, नबज्योती बोरे आसाम हे दोघे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. शनिवारी दुपारी ३ वाजता दारूच्या नशेत ते होडी घेऊन जुनसवाडा मांद्रे येथील खाडीत उतरले. दोघांनाही होडी कशी चालवायची याची माहिती नसल्याने होडी पलटली. एक होडीखाली राहिला तर दुसरा एका बाजूच्या झाडाच्या सहाय्याने वर आला.
होडीच्या खाली असलेल्या २५ वर्षांच्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी स्वतः शोध मोहीम सुरू केली. त्यांच्याबरोबर पंच रोजा फर्नांडिस व स्थानिकांनी मिळून शोध घेतला.
सरपंच फर्नांडिस म्हणाले, एखादा व्यक्ती बुडाल्यावर सरकारी यंत्रणा उशिरा घटनास्थळी पोचतात. याबाबत सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे.