शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण
जोयडा : सिरसी तालुक्यातील मत्तीघाटाजवळ असलेला जोगन हक्कलू धबधबा पाहण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या युवकाचा पाय घसरून नाल्यात पडून बुडाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. पवन जोगी (२४) असे या युवकाचे नाव असून सिरसी तालुक्यातील सोमनळी गावचा तो रहिवासी आहे.
गेल्या चार दिवसांपासून सिरसी ग्रामीण पोलीस तसेच मारीकांबा लाईफगार्डचे पथक या युवकाचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांना युवक सापडला नसल्याने गुरुवारी संध्याकाळी शोधमोहिमेसाठी एनडीआरएफ पथकाला पाचरण करण्यात आले आहे. एनडीआरएफचे २८ जवान पवनचा शोध घेत आहेत. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.
चार दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसोबत हा युवक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी धबधब्याजवळून वेगाने वाहणारा नाला ओलांडताना पाय घसरून तो पाण्यात पडला होता.