इराण आणि इस्रायलमधील युद्ध गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. याच दरम्यान कॅनडात सुरू असलेल्या जी ७ परिषदेने इराणला कडक इशारा दिला आहे. शिखर परिषदेतील देशांनी यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात इराणने इस्रायलवरील हल्ले न थांबवल्यास त्यांना कधीच अण्वस्त्रे बनवून दिले जाणार नाही, असे म्हटले आहे. या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील उपस्थित लावली आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कॅनडाला शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचे देखील खळबळजनक विधान समोर आले आहे. नेतन्याहूंन इराण-इस्रायलमधील संघर्ष अयातुल्ला खामेनींच्या हत्येने संपेल असे त्यांनी म्हटले आहे. अयातुल्ला खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. सध्या इस्रायल खामेनींच्या हत्येचा कट रचत असल्याचे म्हटले जात आहे.
१३ जून रोजी इस्रायलच्या हल्ल्याने सुरू झालेले हे युद्ध गेले पाच दिवस झाले सुरू आहे. इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला, तसेच अनेक आण्विक मुख्यालयावर, लष्करी कमांड सेंटर्सवरही हल्ला केला. यामध्ये इराणचे अनेक उच्च लष्करी अधिकारी ठार झाले. यानंतर इराणने देखील इस्रायलवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सध्या दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. या युद्धात आतापर्यंत २२४ इराण नागरिकांचा मृत्यू झाला आहे, १२०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर २४ इस्रायली नागरिकांचा मृत्यू आणि ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
एक काळ असा होता जेव्हा इराण आणि इस्रायल या दोन्ही दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध होते. दोन्ही देशांमध्ये राजनैतिकच नव्हे, तर लष्करी आणि धोरणात्मक संबंध देखील अधिक मजबूत होते. परंतु गेल्या ४५ वर्षा दोन्ही देशांत कटुता निर्माण झाली. सध्या दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. १९७९ मध्ये शाह सल्तनत संपुष्टात आली आणि इरानमध्ये इस्लामिक क्रांती प्रस्थापित झाली. यानंतर दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधामध्ये कटुता निर्माण झाली. नव्या सरकारने इस्रायलला सैतान म्हणून संबोधले. यानंतर हा तणाव वाढत गेला आणि दोन्ही देश एकमेकांचे १ नंबरचे कट्टर शत्रू बनले. पॅलेस्टाईनच्या मुद्दावरून दोन्ही देश अनेकवेळा आमने-सामने आले आहे. तसेच हिजबुल्लाह, हमास सारख्या संघटनांना इराणने पाठिंबा दिला. यामुळे इस्रायलने याला विरोध करण्यास सुरुवात केली.
- गणेशप्रसाद गोगटे