साहित्य :
बोनलेस चिकन २५० ग्रॅम
मिरची पावडर- १ चमचा
काश्मिरी मिरची पावडर- १ चमचा
काळीमिरी पावडर
जिरे पावडर-अर्धा चमचा
हळद पावडर-अर्धा चमचा
थोडी कोथिंबीर बारीक चिरून
मीठ चवीनुसार, दही-अर्धा कप
तेल-पाव कप
टोमॅटो केचप- १ चमचा
अर्ध्या लिंबाचा रस.
कोथिंबीर पुदिना चटणीसाठी : दही-पाव कप, पुदिना पाने- अर्धा कप, कोथिंबीर- अर्धा कप, हिरवी मिरची- १, लसणाच्या पाच कळ्या, जिरे- १ चमचा, साखर- १ चमचा.
कृती :
एका पातेल्यात चिकन घेऊन त्यात काश्मिरी मिरची पावडर, हळद , मिरची, जिरे, काळीमिरी पावडर, मीठ, दही, तेल, टोमॅटो केचप, लिंबू रस घालून एकत्रित करावे आणि १५ मिनिटे मुरवत ठेवावे. एका कढईत तेल तापत ठेवून मुरवलेले चिकन घालून मोठ्या आचेवर १५ मिनिटे परतून घ्यावे. त्यानंतर एक पराठा घेऊन त्यावर कोथिंबीर पुदिना चटणी लावावी. शिजवलेले चिकन घालावे, वरून उभा चिरलेला कांदा घालावा आणि रोल करून गरमागरम खायला घ्यावे.
कविता आमोणकर