तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यात घडली घटना
धर्मपुरीः 'गुड बॅड अग्ली' फेम आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाईन टॉम चाको याच्या कारला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत त्याचे वडील सी.पी. चाको यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील त्याची आई, भाऊ आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील पलाकोट्टईजवळ हा अपघात घडला आहे असून, त्यांची कार एका लॉरीला धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चाको याची कार समोरून येणाऱ्या एका लॉरीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात शाईनच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारमध्ये उपस्थित असलेले लोक गंभीर जखमी झाले.
अपघात घडल्यानंतर शाईन टॉम चाकोसह इतर जखमी सदस्यांना तातडीने पलाकोट्टई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाईन टॉम चाकोची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय पथक सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शाईन टॉम चाको हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटात अभिनय केला आहे.