दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निवाडा
📢 मडगाव: दांडेवाडा-चिंचणी येथे झालेल्या अपघातात अब्दुल मजीद मुल्ला (४५) याचा मृत्यू झाल्याप्रकरणी, त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून ४१.६६ लाख रुपये द्यावेत, असा निवाडा दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी दिला आहे.
🚨 अपघाताची माहिती: २९ जुलै २०२२ रोजी रात्री पावणेदहा वाजता दांडेवाडो-चिंचणी येथील युनियन बँकेसमोर राष्ट्रीय महामार्गावर हैद्राबाद येथील ट्रॅव्हल्स कंपनीचा एक टेम्पो उजव्या बाजूची डिकी उघडून पार्क केलेला होता.
कुंकळ्ळीकडून मडगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची टेम्पोच्या उघड्या डिकीला धडक बसली
दुचाकीस्वार अब्दुल मजीद मुल्ला गंभीर जखमी झाला
३१ जुलै २०२२ रोजी गोमेकॉत (जीएमसी) मध्ये उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले
⚖️ कायदेशीर टीप: प्रतिवादी पक्षांना त्यांची बाजू मांडण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली होती, परंतु ते प्रत्येक सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने 'एक्स पार्टी' म्हणून निवाड्याची घोषणा केली.