फुटबॉल लागल्याने जखमी दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

गणेशपुरी म्हापशातील घटना

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th June, 01:14 am
फुटबॉल लागल्याने जखमी दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे फुटबॉल बसून दुचाकीवरून कोसळल्याने जखमी झालेल्या यल्लम्मा बसवराज लक्कुंदी (५३, रा. मोरजी पेडणे व मूळ कर्नाटक) हिचे उपचारादरम्यान निधन झाले.

अपघात ३१ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला होता. महिला आपल्या जावयासमवेत दुचाकीवरून मोरजीहून म्हापशाकडे येत होती. ते गणेशपुरी येथील क्रीडा मैदानासमोर पोहोचले. यावेळी मैदानावर काही मुले फुटबॉल खेळत होती. त्यांचा फुटबॉल दुचाकीवरून जाणार्‍या महिलेला बसला आणि ती दुचाकीवरून खाली पडून जखमी झाली. तिला प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना सोमवारी, २ रोजी तिचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा