युवतीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी वकिलासह अज्ञाताविरोधात गुन्हा

पीडितेकडून कोलवा पोलिसांत गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th June, 12:38 am
युवतीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी वकिलासह अज्ञाताविरोधात गुन्हा

मडगाव : युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना कोलवा परिसरात घडलेली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार कोलवा पोलिसांनी वकिलासह आणखी एका अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कोलवा परिसरात एका युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे. या प्रकरणी पीडितेकडून कोलवा पोलिसांत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली. सध्या कोलवा पोलिसांकडून युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका वकिलासह आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोलवा पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे.

सदर पीडितेला एका प्रकरणात पोलिसांकडून अटक झाली होती. त्यावेळी संशयित वकिलाने तिचे वकीलपत्र घेत तिला जामीन मंजूर करून दिला होता. यानंतर ओळखीचा फायदा घेत सदर वकिलासह इतर व्यक्तीकडून तिच्यावर माजोर्डा येथील हॉटेलात तसेच पणजी येथे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता.

हेही वाचा