जिल्हा, प्रथमवर्ग न्यायालयांच्या १८ न्यायाधीशांच्या बदल्या

मुंबई उच्च न्यायालय महानिबंधकांकडून आदेश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15 hours ago
जिल्हा, प्रथमवर्ग न्यायालयांच्या १८ न्यायाधीशांच्या बदल्या

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोव्यातील जिल्हा आणि प्रथमवर्ग न्यायालयाच्या १८ न्यायाधीशांच्या वार्षिक बदल्या करण्यात आल्या आहे. याबाबतचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महानिबंधक समीर एस. आडकर यांनी जारी केला आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पाच जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यानुसार, न्या. विजया आंब्रे यांची मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. गोवा प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष न्या. द्विजपल पाटकर यांची म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी बदली केली आहे. त्या ठिकाणी असलेल्या न्या. शर्मिला पाटील यांची गोवा प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदी बदली केली आहे. न्या. राम प्रभुदेसाई यांची मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात बदली केली आहे. न्या. अपूर्वा नागवेकर यांची म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी बदली केली आहे.

वरिष्ठ श्रेणी ९ दिवाणी न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, न्या. शुभदा दळवी आणि न्या. वैशाली लोटलीकर यांची मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात बदली केली आहे. न्या. सारिका फळदेसाई यांची मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात बदली केली आहे. न्या. कार्लो सांतान डिसिल्वा यांची फोंडा प्रथमवर्ग न्यायालयात, न्या. गिरीजा गावकर यांची केपे प्रथमवर्ग न्यायालयात, न्या. पूजा सरदेसाई, न्या. सुमन गाड आणि न्या. ज्युड सिक्वेरा यांची म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात बदली केली आहे. न्या. नीलिमा काणकोणकर यांची मडगाव येथील दक्षिण गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पदावरच नियुक्ती केली आहे.

याशिवाय कनिष्ठ श्रेणी ४ दिवाणी न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, न्या. अक्षता काळे यांची म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशपदी, न्या. पूर्वा नाईक यांची सत्तरी वाळपई प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशपदी, न्या. अनुषा कायसूकर डिचोली प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशपदी तर न्या. वासिम रिझवी यांची सांगे प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे. 

हेही वाचा