वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार देविया राणे यांच्याकडून स्पष्ट
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वन खात्याच्या अखत्यारीत असलेले धबधबे मान्सून पर्यटनाचा भाग असल्याने ते पर्यटकांसाठी खुले असतील. वन खाते तसेच वनविकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या धबधब्यांसाठी बंदी आदेश लागू नाही, असे वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार देविया राणे यांनी स्पष्ट केले.
वन खाते तसेच वनविकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेले धबधबे पावसाळ्यात पर्यटनासाठी खुले असतील. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली बंदी वन खाते, तसेच वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील धबधब्यांसाठी लागू होत नाही, असे अध्यक्ष आमदार देविया राणे यांनी सांगितले. पर्यटकांसाठी ‘लाईफ जॅकेट’ तसेच इतर सुरक्षा उपायांची कार्यवाही करण्यात येईल. ठरावीक गेटमधून प्रवेश दिला जाईल. धबधब्यांवर प्रवेशाव्यतिरिक्त ट्रॅकिंगसुद्धा सुरू राहणार आहे, असे देविया राणे यांनी स्पष्ट केले.