युवतीला कॉल, संदेश पाठविणे आले अंगलट

युवकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th May, 11:32 pm
युवतीला कॉल, संदेश पाठविणे आले अंगलट

मडगाव : कलाटा येथील संशयित रुपेश पार्सेकर याने नुवेतील युवतीच्या वॉट्सअॅपवर तिच्या इच्छेविरोधात व्हॉईस व व्हिडिओ कॉल केले. सदर युवक तक्रारदार युवतीचा चालक म्हणून काम करीत आहे. याप्रकरणी तक्रार नोंद झाल्यानंतर मायना कुडतरी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नुवे येथील शबनम हलदार या युवतीने मायना कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. संशयित रुपेश पार्सेकर हा तक्रारदार शबनम हिचा चालक म्हणून काम करीत आहे. मे महिन्यात संशयिताने शबनम हिच्या मोबाईलवर अनावश्यक संदेश पाठवले. तिला वॉट्सअॅपवर व्हॉईस कॉल व व्हिडिओ कॉलही केले. सदर युवक तक्रारदार युवतीसोबत तिच्या इच्छेविरोधात संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. मायना कुडतरी पोलिसांकडून तक्रार आल्यावर संशयित रुपेश याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी पुढील तपास करीत आहेत.