महिला, बालविकास खात्याची वेबसाईट हॅक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
महिला, बालविकास खात्याची वेबसाईट हॅक

पणजी : राज्य सरकारच्या वेबसाईटवरून नागरिकांना उपयुक्त माहिती दिली जाते. हल्लीच काही वेबसाईट अद्ययावत करण्यात आल्या. मात्र महिला आणि बालविकास खात्याची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे.

या वेबसाईटवर महिला आणि बालविकास खात्याच्या योजनांची माहिती देणाऱ्या लिंक्सच्या जागी सायबर हल्लेखोरांनी ऑनलाईन कॅसिनो व अन्य विषयांशी संबंधित लिंक अपलोड केल्या आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन गेमिंग संदर्भातील माहिती समोर येते. वेबसाईटवरील डेटासंबंधी पुरेशी खबरदारी घेऊनही वेबसाईट हॅक झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा