सासष्टी : पत्नीच्या खून प्रकरणी पती दोषी, उद्या सुनावणार शिक्षा

सां जुझे दी अरीयाल येथील सावरीचो दांडो परिसरात घडली होती घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
सासष्टी : पत्नीच्या खून प्रकरणी पती दोषी, उद्या सुनावणार शिक्षा

मडगाव : मायना कुडतरीतील सां जुझे दी अरीयाल सावरीचो दांडो येथील क्रशरच्या ठिकाणी २०२१ मध्ये संशयित गुलशन तिर्की याने पत्नी बसंती तिर्की हिचा खून केला होता. याप्रकरणी संशयित गुलशन याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. उद्या १५ मे रोजी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.

सां जुझे दी अरीयाल परिसरातील सावरीचो दांडो ओलेमोल परिसरात क्रशरच्या ठिकाणी काम करणारा कामगार गुलशन तिर्की (मूळ झारखंड) हा पत्नी बसंतीसह भाड्याच्या खोलीत राहत होता. गुलशनने पत्नी बसंती तिर्की हिच्यावर चाकूने हल्ला करत तिचा खून केला. या घटनेनंतर संशयित गुलशन घटनास्थळावरून पसार झाला होता. 

तत्कालीन पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी विविध पथके स्थापन करत तपास सुरू केला होता. त्यानंतर संशयिताला गुढी चांदर परिसरातून अटक करण्यात आलेली होती. तसेच त्याने खून प्रकरणात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला होता. आता दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली असता संशयित गुलशन याला खून केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला १५ मे रोजी सकाळी शिक्षा सुनावली जाणार आहे.

हेही वाचा