ज्यूनिअर स्टेनोग्राफरः दुसरी सीबीटी परीक्षा होणार दोन केंद्रांवर

२५ रोजी आग्नेल इन्स्टिट्यूट, रोझरी कॉलेजमध्ये होईल परीक्षा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
ज्यूनिअर स्टेनोग्राफरः दुसरी सीबीटी परीक्षा होणार दोन केंद्रांवर

पणजी : गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत घेतली जाणारी ज्यूनिअर स्टेनोग्राफर पदासाठीची दुसरी सीबीटी परीक्षा (सीबीटी - ३) आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आसगाव व रोजरी कॉलेज, नावेली - मडगाव या दोन केंद्रांवर रविवारी २५ मे रोजी सकाळी ९.१५ ते १०.३० या वेळेत होणार आहे.

आयोगाने सीबीटी - ३ परीक्षेची तारीख पूर्वी जाहीर केली होती. मात्र केंद्र व वेळ आता जाहीर करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात आग्नेल इन्स्टिट्यूट आणि दक्षिण गोव्यात रोझरी कॉलेज अशी दोन केंद्रे आहेत. उमेदवारांना अॅडमीट कार्ड इमेलद्वारे पाठविण्यात आले असून आणखी दोन दिवसांनी ते आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. 

६० गुणांच्या पेपरसाठी ७५ मिनिटांचा कालावधी असणार आहे. पेपर सकाळी ९.१५ वाजता सुरू होणार असला तरी उमेदवारानी सकाळी ८.३० ते ९ या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. दुसऱ्या सीबीटी परीक्षेला २५० उमेदवार बसणार आहेत. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाने यापूर्वीच जाहीर केली आहे.

हेही वाचा