स्मार्ट वीज मीटर कार्यवाहीसाठी गोव्याला केंद्राकडून अर्थिक मदत

मुंबईतील वीजमंत्र्यांच्या परिषदेत वीजनिर्मितीवर झाली चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
स्मार्ट वीज मीटर कार्यवाहीसाठी गोव्याला केंद्राकडून अर्थिक मदत

मुंबईत पश्चिमी राज्यांच्या परिषदेत उपस्थित केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर. सोबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर.

पणजी : स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या कार्यवाहीसाठी केंद्र सरकार गोव्यासह इतर राज्यांना अर्थिक मदत देणार आहे. मुंबईत झालेल्या वीजमंत्र्यांच्या परिषदेत या संदर्भात चर्चा झाली.
पश्चिमी राज्यांच्या वीजमंत्र्यांची परिषद मुंबईत झाली. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Lhattar) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) तसेच केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) व इतर राज्यांचे वीजमंत्री उपस्थित होते.
गोव्यात वीज गळतीचे प्रमाण कमी आहे. विजेची गळती कमी करण्यासाठी गोव्याने चांगले कार्य केले आहे. गोव्यासह छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांनीही विजेची गळती कमी करण्यासाठी चांगले कार्य केले. विजेची गळती कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याची गरज आहे. सरकारी कार्यालये आणि सरकारी घरांमध्ये प्राधान्याने स्मार्ट मीटर बसवायला हवेत. ऑगस्ट २०२५ पर्यंत सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम पूर्ण व्हायला हवे, असे आवाहन केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले.
वीज वितरणात सुधारणा करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर यावेळी चर्चा झाली.

वीज निर्मिती प्रकल्प गरजेचे!
राज्यांनी स्वतंत्र वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर विचार व्हायला हवा. बहुतेक राज्ये विजेसाठी केंद्र तसेच इतर राज्यांवर अवलंबून आहेत. भविष्यात ही स्थिती परवडण्यासारखी नाही. पवनचक्की, सोलर तसेच आण्विक अशा प्रकल्पांच्या आधाराने वीजनिर्मिती होण्याची गरज आहे. वीजनिर्मितीवरील परिषदेत यावर चर्चा झाली, अशी माहिती गोव्याचे मुख्य वीज अभियंते स्टीफन फर्नांडिस (Stephan Fernandes) यांनी दिली.

हेही वाचा