रस्ता सुरक्षेबाबत पोलीस महासंचालकाचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, जबाबदारीचे भान...

वाहन चालविणाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण होणे आवश्यक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
रस्ता सुरक्षेबाबत पोलीस महासंचालकाचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, जबाबदारीचे भान...

पणजी : रस्त्यावर वाहन चालविणे ही मोठी जबाबदारी असते. वाहन चालवताना जबाबदारीचे भान येण्यासाठी विद्यालय पातळीपासून रस्ता सुरक्षेचे धडे देण्याची गरज आहे. हेल्मेट नसणे व ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह ही अपघाती मृत्यूंची प्रमुख कारणे आहेत. 

अशा कारणांमुळे राज्यात वर्षाला सरासरी ३०० जणांचा अपघाती मृत्यू होतो असे पोलीस महासंचालक आलोक कुमार म्हणाले. आल्तिनो येथे वैश्विक रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात रस्ता सुरक्षेबाबत जागृती तसेच प्रशिक्षण देण्यात आले. वाहतूक पोलीस रस्ता सुरक्षेबाबत सर्वत्र विविध प्रकारे जागृती करत असतात. वाहन चालविणाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण झाली, जबाबदारीचे भान आले, तरच पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असे म्हणता येईल. 

रस्त्यावर वाहन चालविण्यापूर्वी प्रत्येकाने स्वत: बरोबर इतरांच्या सुरक्षेचे भान ठेवायला हवे. कोणतीही चांगली सवय ही लहानपणापासून लागायला हवी. रस्ता सुरक्षा व वाहन चालवताना आवश्यक असणाऱ्या जबाबदारीबाबतही असेच म्हणावे लागेल. यामुळे यापुढे विद्यार्थी व युवा वर्गाला रस्ता सुरक्षेचे धडे देण्यावर भर असणार आहे, असे पोलीस संचालक आलोक कुमार म्हणाले.

हेही वाचा