केवळ ११० रुपयांवरून २० वर्षांचा लढा
हरियाणा रोडवेजच्या निवृत्त कंडक्टरला न्यायालयाचा दिलासा
Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
13th May, 07:49 pm

🔥 मोठी बातमी | Big News
🚨 नवी दिल्ली ११० रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात तब्बल दोन दशकांनंतर हरियाणा रोडवेजच्या निवृत्त कंडक्टरला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शिस्तपालन आणि अपील प्राधिकरणाचा आदेश रद्द करत, कंडक्टरला रोखून ठेवलेले पगार व भत्ते तीन महिन्यांच्या आत देण्याचे निर्देश हरियाणा रोडवेजला दिले आहेत.
१९८१ मध्ये नियुक्त झालेला हा कंडक्टर दिल्ली बाहेर धावणाऱ्या रोडवेज बसमध्ये काम करत होता. २००६ मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा प्रवाशांकडून तिकीट न देता ११० रुपये वसूल केल्याचा आरोप झाला.
पुढे त्याच्याविरोधात असे आणखी चार आरोप करण्यात आले. तपासादरम्यान प्राधिकरणाने त्याच्यावर फसवणूक व वरिष्ठांशी गैरवर्तनाचे आरोप सिद्ध ठरवत, त्याला सेवेतून बडतर्फ केले आणि सर्व फायदेही थांबवले. 😤
विशेष
मात्र, खटल्यात स्वतःचे प्रतिनिधित्व करताना कंडक्टरने गेल्या वीस वर्षांत लाखो रुपये खर्च केले. अखेर, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रतीक जलौन यांच्या खंडपीठाने या प्रकरणात दोन महत्त्वाच्या पैलूंवर विचार केला. एक म्हणजे, फसवणुकीचा स्वरूप आणि दुसरा इतक्या वर्षांतील आर्थिक व मानसिक त्रास. 💡
आता हा कंडक्टर निवृत्त झालेला असला, तरी न्यायालयाने त्याला सेवानिवृत्तीपूर्वीचे सर्व पगार, भत्ते आणि इतर फायदे दिले जावेत, असा स्पष्ट आदेश दिला आहे. ✅
📢 न्यायालयीन निर्णय
काय म्हटले खंडपीठाने आदेशात?
खंडपीठाने नमूद केले की, सामान्यतः अशा प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू करण्याचा नियम आहे. मात्र, न्यायालयांकडे दीर्घकालीन खटले थांबवण्याचा विशेष अधिकार आहे. याआधीही अशा काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने आरोपींना दिलासा दिला आहे. त्याच सिद्धांताचा अवलंब करत, न्यायालयाने कंडक्टरच्या बाजूने निर्णय दिला. ⚖️