६८ कर्मचाऱ्यांनाही अन्यत्र हलवले
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यातील चेक पोस्ट सक्षम करण्यासाठी, तसेच बाहेरून येणाऱ्या आणि गोव्यातून बाहेर जाणाऱ्या दारूची तस्करी रोखण्यासाठी अबकारी खात्याने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार, चेक पोस्टवर सात अधिकाऱ्यांची आणि ६८ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत अतिरिक्त अबकारी आयुक्त गौरेश शंखवाळकर यांनी दोन वेगवेगळे आदेश जारी केले आहेत.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सात अबकारी उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात देऊ राऊत यांच्यासह लक्षदीप कुंकळ्येकर आणि आशिष गावकर यांची नयबाग चेक पोस्टवर बदली झाली आहे. विग्नेश गावस यांची प्रत्रादेवी, विग्नेश घाडी यांची किरणपाणी, सुशांत फडते यांची केरी, तर व्यंकटेश कळंगुटकर यांची दोडामार्ग चेक पोस्टवर बदली झाली आहे. राज्यातील सात चेक पोस्टवर ६७ आणि केपे अबकारी स्थानकावर एक मिळून ६८ अबकारी गार्ड आणि साहाय्यक अबकारी गार्डची बदली करण्यात आली आहे. पत्रादेवी चेक पोस्टवर ५ अबकारी गार्ड आणि १० साहाय्यक अबकारी गार्डची बदली करण्यात आली आहे. मोले चेक पोस्टवर २ अबकारी गार्ड आणि ११ साहाय्यक अबकारी गार्ड, पोळे चेक पोस्टवर ६ अबकारी गार्ड आणि ६ साहाय्यक अबकारी गार्ड, किरणपाणी चेक पोस्टवर ६ अबकारी गार्ड आणि ५ साहाय्यक अबकारी गार्ड, दोडामार्ग चेक पोस्टवर ५ अबकारी गार्ड आणि १ साहाय्यक अबकारी गार्ड, नयबाग चेक पोस्टवर २ अबकारी गार्ड आणि ३ साहाय्यक अबकारी गार्डाची बदली करण्यात आली आहे. केपे अबकारी स्थानकावर एका साहाय्यक अबकारी गार्डाची बदली करण्यात आली आहे.