पणजी : ऑपरेशन सिंदूरनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, राज्यभरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. किनारपट्टी आणि पर्यटनदृष्ट्या संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.
केंद्र व सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वयाने बैठका सुरू आहेत. बुधवारी राज्यात मॉक ड्रिलही पार पडले असून आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी तपासण्यात आली. बैठकीतील काही निर्णय गोपनीय असल्याचे पर्वरी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर बोलताना पोलीस महासंचालक आलोक कुमार म्हणाले.