शिरगाव चेंगराचेंगरी : गोमेकॉत १५ जखमींवर उपचार सुरू; एकाची प्रकृती चिंताजनक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th May, 04:25 pm
शिरगाव चेंगराचेंगरी : गोमेकॉत १५ जखमींवर उपचार सुरू; एकाची प्रकृती चिंताजनक

पणजी : शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रेत उद्भवलेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्यापैकी एका रुग्णाची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे आणि तो उपचारांना प्रतिसाद देत नसल्याची माहिती गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली.

सध्या गोमेकॉ १५ जखमींवर उपचार सुरू असून, यापूर्वी उपचार घेत असलेल्या २१ जखमींपैकी ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अत्यवस्थ असलेल्या ४ रुग्णांपैकी ३ जणांची प्रकृती सुधारत असल्याचेही हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले.

शनिवारी पहाटे शिरगाव येथे लईराई देवीच्या जात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०हून अधिक जण जखमी झाले होते. जखमींवर साखळी, डिचोली, म्हापसा आणि गोमेकॉ येथे उपचार सुरू होते. आता बहुतांश गंभीर रुग्ण गोमेकॉत हलवले गेले आहेत.

हेही वाचा