पेडणे : शाश्वत मत्स्य व्यवसायाला मिळणार चालना : निळकंठ हळर्णकर

मत्स्य विभागाच्या रॅम्पवर उभारल्या कृत्रिम प्रवाळभित्ती (कोरल रीफ)

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 03:10 pm
पेडणे : शाश्वत मत्स्य व्यवसायाला मिळणार चालना : निळकंठ हळर्णकर

पणजी : : गोव्यात शाश्वत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केरी, पेडणे येथे मत्स्य विभागाच्या रॅम्पवर कृत्रिम प्रवाळभित्ती (कोरल रीफ) उभारण्यात आल्या. या उपक्रमात  मच्छिमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी सहभाग घेतला. यावेळी स्थानिक आमदार जित आरोलकर, पंचायत सदस्य, विभागाचे सचिव व अन्य मान्यवरही उपस्थित होते.


कृत्रिम प्रवाळभित्तींच्या माध्यमातून मासळी उत्पादनात वाढ होणार असून स्थानिक मच्छीमारांना शाश्वत उपजिविकेचा आधार मिळणार आहे, असे मंत्री हळर्णकर म्हणाले. सागरी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. कृत्रिम प्रवाळभित्ती नैसर्गिक अधिवासाची हुबेहूब प्रतिकृती तयार करतात. यामुळे मासळी प्रजननास अनुकूल वातावरण तयार होते आणि सागरी जैवविविधतेत वाढ होते.



केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत गोव्यात १४ प्रकारच्या माशांच्या उत्पादन व वाढीसाठी खास योजना राबवली असून, मांद्रेतील केरी व हरमल अश्या दोन भागात ही योजना कार्यान्वित केली आहे. मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने गोव्यासाठी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर कृत्रिम प्रवाळभित्तींची उभारणी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.


हेही वाचा