साहित्य
३ ते ४ चमचे बारीक चिरलेल्या लसूण, २ ते ३ इंच आलं /आलं लसूण पेस्ट, २ उभे बारीक चिरलेले गाजर, २ उभे चिरलेले कांदे, १ उभी चिरलेली ढोबळी मिरची, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, १ मोठा चमचा टोमॅटो सॉस, १ मोठा चमचा शेजवान सॉस, १ बारीक चमचा सोया सॉस, १ बारीक चमचा व्हिनेगर, १ बारीक चमचा काळी मिरी, नूडल्स, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती
एका भांड्यात नूडल्स शिजवण्यासाठी पाणी तापत ठेवा. पाणी तापलं की त्यात नूडल्स घाला व नूडल्स शिजवून घ्या. नूडल्स शिजले की कडून घ्या. आता एका भांड्यात ३ ते ४ चमचे तेल घाला. तेल तापलं की त्यात ३ ते ४ चमचे बारीक चिरलेली लसूण, २ ते ३ इंच आलं /आलं लसूण पेस्ट घाला व ३० सेकंदासाठी भाजून घ्या. मग यात २ उभे बारीक चिरलेले गाजर, २ उभे चिरलेले कांदे, १ उभी चिरलेली ढोबळी मिरची, १ वाटी कोबी घाला व या पूर्ण भाज्या मंद गॅस वर शिजवून घ्या. या भाज्या शिजल्या की यात १ मोठा चमचा टोमॅटो सॉस, १ मोठा चमचा शेजवान सॉस, १ बारीक चमचा सोया सॉस, १ बारीक चमचा व्हिनेगर, १ बारीक चमचा काळी मिरी, नूडल्स, चवीनुसार मीठ घाला व सर्व छान एकत्र करा. ३ ते ४ मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवा. आता नूडल्सवर भरभरून कोथिंबीर टाका. तर अश्या प्रकारे शेजवान नूडल्स तयार आहे.
संचिता केळकर