भाज्यांचे दर स्थिर; मानकुरादचा दर जैसे थे

हापूस आंब्याचे दर उतरले : ओले काजू बाजारात दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 12:04 am
भाज्यांचे दर स्थिर; मानकुरादचा दर जैसे थे

पणजी : सोमवारी पणजी बाजारात मानकुराद आंब्याचे दर मागील आठवड्याप्रमाणेच होते. तर हापूस आंब्याचे दर आणखी कमी झाले. बाजारात आकारानुसार मानकुराद आंबा १२०० ते अडीच हजार रुपये डझन होते. तर मध्यम आकाराचे हापूस आंबे ५०० रु. तर मोठे आंबे ८०० रुपये डझन दराने विकले जात होते. पायरी आंबे ३०० ते ३५० रु. किलो दराने विकले जात होते.
सोमवारी पणजी बाजारात तोतापुरी आंबे १८० रुपये किलो तर सिंदुरी आंबे २०० रु. किलो दराने विकले जात होते. कैऱ्या ५०० रुपये १०० तर ओले काजूगर २५० रुपयांना विकले जात होते. लिंबाचे दर आकारानुसार ८ ते १० रुपये नग होते. टोमॅटो ३०, बटाटा आणि कांदा प्रत्येकी ४० रुपये किलो होता. मिरची आणि ढब्बू मिरची ८० रुपये किलो होती.
बाजारात काकडीचे दर ५० रुपये किलो होते. गाजर ८० रुपये, भेंडी ६० रू. कारले ८० रुपये तर वालपापडी १२० रुपये किलो होती. कोबीच्या एक गड्डा ४० रुपये तर फ्लॉवरचे दर ४० रुपये होते. आल्याचे दर १२० ते १४० रुपये किलो होते. तर लसूण आकारानुसार २०० ते ३०० रुपये किलो होता.
मेथी २० रु., शेपू १५ रु., पालक १० रु., कांदा पात १० रु., तर तांबडी भाजी १० रु. होते. कोथिंबीरचे २० रु. जुडी होती. सोमवारी फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी २० रु. , कोबी १८ रु.,गाजर ३३ रु.,फ्लॉवर २३ रु. एक नग, वालपापडी ९६ रु., मिरची ६२ रु., कांदा २६ रु., बटाटा ३२ रु. तर टोमॅटो २५ रुपये किलो होता.
लहान नारळ उपलब्ध
गेले काही महिने पणजी बाजारात लहान नारळ उपलब्ध होत नव्हते. सध्या बाजारात लहान नारळ उपलब्ध झाले असून ते २५ रुपये दराने विकले जात होते. तर मध्यम आकाराचा नारळ ४० रूपये नग होता. तर शहाळ्याचे दर वाढून ६० रुपये नग झाले.