पतंजली रिसर्च येथे ‘नाबार्ड’ प्रतिनिधींचा एकदिवसीय दौरा
पतंजली रिसर्च फाउंडेशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘नाबार्ड’च्या प्रतिनिधींसोबत आचार्य बाळकृष्ण.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी सर्वोच्च पर्यवेक्षी संस्था म्हणून भारताच्या सर्वोच्च ‘राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक’ (नाबार्ड) द्वारे प्रायोजित एकदिवसीय कार्यक्रम पतंजली रिसर्च फाउंडेशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील विकासात्मक उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आणि समतापूर्ण शेतीला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. कार्यक्रमाची सुरुवात यज्ञाने झाली. आचार्य बाळकृष्ण यांनी पाहुण्यांचे शाल, हार आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. कार्यक्रमात नाबार्डचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आचार्य बाळकृष्ण म्हणाले, ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी ‘नाबार्ड’ महत्त्वाची संस्था आहे. त्यात पशुपालनासाठी अनेक योजना आहेत, ज्यात किसान क्रेडिट कार्ड योजना, व्याज अनुदान योजना, दीर्घकालीन कर्ज आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी इत्यादींचा समावेश आहे. कृषी क्षेत्रातील पतंजलीच्या कृती आराखड्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करणे समाविष्ट आहे.
उत्तराखंडमध्ये स्थलांतर रोखण्यासाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देणे हेही प्रमुख उद्दिष्ट आहे. पतंजलीने मध आणि इतर कृषी उत्पादनांची थेट खरेदी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याचा काळ डिजिटल क्रांतीचा आहे आणि पतंजलीने भरुआ सोल्युशन अंतर्गत बी-बँकिंगद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने जोडून त्यांच्या कर्जात पारदर्शकता सुनिश्चित केली आहे. यासोबतच, पतंजलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमतही मिळत आहे. पतंजली जैविक संशोधन संस्थेने माती परीक्षण संचदेखील विकसित केला आहे.
नाबार्डचे अध्यक्ष म्हणाले की, सरकारी प्रयत्न आणि उपक्रमांमुळे नाबार्डचे पतंजलीसोबत सहकार्य आहे. पतंजली आणि नाबार्ड एकत्रितपणे सर्जनशील कार्य प्रभावीपणे करू शकतात. हा कार्यक्रम मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आहे.