गुन्हेवार्ता : बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३८.४ कोटी रुपयांचे कोकेन जप्त

घानाच्या महिलेस अटक. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अमलीपदार्थ तस्करीमागील सिंडीकेटचा शोध घेण्याचे यंत्रणांसमोर आव्हान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th March, 12:18 pm
गुन्हेवार्ता : बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर  ३८.४ कोटी रुपयांचे कोकेन जप्त

बंगळुरू : येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घाना येथील एका महिलेकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) कर्मचाऱ्यांनी ३८.४ कोटी रुपयांचे सुमारे ३.१८६ किलो कोकेन जप्त केले.

अटक करण्यात आलेली घानाची नागरिक जेनिफर आबे बुधवारी कतारमधील दोहा येथून बेंगळुरूला आली. एका गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. झडती दरम्यान, तिच्याकडे अमलीपदार्थ आढळून आला. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा शोध घेण्यासाठी अधिक चौकशीसाठी सदर महिलेला अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी, बंगळुरूमध्ये दोन दक्षिण आफ्रिकन नागरिकांना एमडीएमएची तस्करी आणि पुरवठा केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे असलेले २७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.


हेही वाचा