जिज्ञासा : आठवड्याचे मिशन ९ महिन्यांपर्यंत लांबले; अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली

अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करत असताना तापमान १६०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्याने कंट्रोल रूमशी संपर्क किमान ७ मिनिटे तुटला होता.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
जिज्ञासा : आठवड्याचे मिशन ९ महिन्यांपर्यंत लांबले; अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली

फ्लोरिडा : नासा आणि एलोन मस्कच्या स्पेस एक्सच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या मोहिमेद्वारे अखेर भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरसह क्रू-९चे सदस्य अमेरिकेचे निक हेग व रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह स्पेस शटल ड्रॅगनमधून फ्लोरिडाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या अमेरिकन आखतात सुखरूपपणे उतरले. ड्रॅगन अंतराळयान १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता समुद्रात लँड झाले. 



या चार अंतराळवीरांनी मंगळवारी १८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडले. जेव्हा हे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत होते तेव्हा त्याचे तापमान १६५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. या काळात सुमारे ७ मिनिटे संपर्क तुटला. नासाच्या कंट्रोलरूम मध्ये काही काळ तणावग्रस्त स्थिती होती. थोड्यावेळाने पुन्हा सिग्नल मिळाल्याने सर्वांच्या जीवात जीव आला.  


स्पेस स्टेशनमधून बाहेर पडून पृथ्वीच्या कक्षेत येत समुद्रात उतरण्यास सुमारे १७ तासांचा अवधी लागला. १८ मार्च रोजी सकाळी ८:३५ वाजता या कठोर प्रवासाला सुरुवात झाली. १०:३५ वाजता अंतराळयान स्पेस स्टेशनपासून वेगळे झाले. १९ मार्च रोजी पहाटे २:४१ वाजता डीऑर्बिट बर्न सुरू झाले.  यानंतर अंतराळयानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ ते समुद्रात उतरले.



सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन'वर गेले होते. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाची अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता. अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरील त्यांच्या ८ दिवसांच्या कालावधीत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. पण थ्रस्टरमध्ये समस्या आल्यानंतर, त्यांचे ८ दिवसांचे मिशन ९ महिन्यांहून अधिक काळ लांबले.


लैंडिंग के कुछ देर बाद ही रिकवरी क्रू स्पेसक्राफ्ट के पास पहुंच गए।

हेही वाचा