मध्यपूर्व आशिया : गाझापट्टीत इस्रायलच्या आयडीएफचा कहर; हमासच्या ठिकाणांवर केला हवाई हल्ला

या हल्ल्यात किमान २०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा. इस्रायलचा हमास विरोधात पुन्हा यल्गार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
मध्यपूर्व आशिया : गाझापट्टीत इस्रायलच्या आयडीएफचा कहर; हमासच्या ठिकाणांवर केला हवाई हल्ला

तेल अविव : मंगळवारी सकाळी इस्रायलने गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात किमान २०० लोक ठार झाल्याची माहिती दिली आहे. जानेवारीमध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतर गाझामध्ये हा सर्वात मोठा हल्ला आहे. युद्धबंदी वाढवण्याच्या चर्चेत कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती न झाल्यामुळे त्यांनी हल्ल्याचे आदेश दिले असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले. 

दरम्यान, मंगळवारी सकाळी इस्रायलने केलेल्या नवीन हवाई हल्ल्यांमुळे त्यांच्यातील युद्धबंदीचा भंग झाला आहे. इस्रायलच्या कारवाईमुळे ओलिसांचे भवितव्य धोक्यात आल्याचे हमासने म्हटले आहे. येत्या काळात ही स्थिती मोठ्या प्रमाणात चिघळण्याची शक्यता नरिमान झाली आहे. 

हेही वाचा