केदारनाथ मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्या!

गैर हिंदूंना प्रवेश नाकारण्याचा भाजप नेत्याकडून सल्ला

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
केदारनाथ मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्या!

उत्तराखंड : उत्तराखंडच्या भाजपा नेत्या आशा नौटियाल यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. केदारनाथ मंदिरात गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी  नौटियाल यांनी केल्याचा प्रकार समोर आला आहे. केदारनाथ येथील आमदार नोटियाल यांनी असे म्हटले आहे की, 'काही हिंदूंव्यतिरक्त अन्य लोक या धार्मिक स्थळाच्या पावित्र्याला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत.'

आशा नौटियाल म्हणाल्या...

'काही गैर हिंदू घटक हे केदारनाथ धामच्या पावित्र्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, केदारनाथ येथे मांसाहार, मासे किंवा मद्य दिले जात आहे का? याबद्दल सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असे नौटियाल म्हणाल्या.

उत्तराखंड ही ‘देवभूमी’ : रावत

नौटियाल यांच्या वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्री हरिष रावत म्हणाले की, 'भाजपा नेत्यांना खळबळजनक वक्तव्ये करण्याची सवय आहे. उत्तराखंड ही ‘देवभूमी’ आहे. इथे तुम्ही सर्व गोष्टींच्या आड धर्म आणाल, तर ते हे चुकीचे आहेत.'

हेही वाचा