गाभारा : 'देवदर्शन घेताय ? मंदिराचे पावित्र्य जपा !', जेजुरी गडावर ड्रेस कोड लागू

फॅशन सेन्सच्या नावाखाली तोडके कपडे परिधान करून जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना यापुढे केला जाईल मज्जाव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
गाभारा : 'देवदर्शन घेताय ? मंदिराचे पावित्र्य जपा !', जेजुरी गडावर ड्रेस कोड लागू

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या पुणे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे. जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. १० मार्च पासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला होता. तसेच त्यासाठी आता नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.


Jejuri Khandoba Mandir: जेजुरीचे खंडोबा मंदिर दीड महिन्यांनी दर्शनासाठी  खुले; गडावर भाविकांची अलोट गर्दी Jejuri News Main Temple In Jejuri Khandoba  Fort opens Darshan For Devotees ...


फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा आणि तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे आता जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावे लागणार आहे.


महाराष्ट्रातील रहस्यमयी खंडोबा मंदिर ! जेजुरी गडावर खरचं नऊ लाख पायऱ्या  आहेत का? | The mysterious Khandoba Temple Jejuri Pune Jejuri Darshan Pune  Tour Maharashtra Tourism


यापुढे खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. पारंपरिक वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान आणि जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष आणि महिला भाविकांना मंदिरांत तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



मंदिरात येताना मंदिराचे पावित्र्य जपले जावे यासाठी गोवा महाराष्ट्र कर्नाटक आणि इतर राज्यांतील अनेक मंदिरांमध्ये ड्रेसकोड जारी करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी येथे असणाऱ्या खंडोबा मंदिरामध्ये देखील ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे


Khandoba Temple Jejuri Pune - Info Facts History Photos

हेही वाचा