चौघे ताब्यात. पुढील तपास सुरू
पणजी : सत्तरीतील केरी चेकपोस्टवर पोलिसांनी सुमारे ३०० किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले. येथून दोन गाड्यांच्या सहाय्याने गोमांसाची बेकायदा वाहतूक करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई केली.
दोन्ही गाड्यांत असलेल्या सुमारे ३०० किलो गोमांसाची किमत ही अंदाजे दीड लाख रुपये इतकीआहे. प्राप्त माहितीनुसार, या दोन्ही गाड्या गोव्याहून बेळगाव येथे जात होत्या. त्यातील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपअधिक्षक जिवबा दळवी आणि वाळपईचे पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.