पणजी : ताळगाव-पणजी येथे बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
माहितीनुसार, चौथ्या मजल्यावर विश्रांती घेत असताना पंखा चालू करण्यासाठी बटन दाबताच संबंधित कामगाराला विजेचा धक्का बसला व त्याचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे.