सासष्टी : युतीबाबत आता बोलणे हे अतिघाईचे ठरेल : युरी आलेमाव

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 hours ago
सासष्टी : युतीबाबत आता बोलणे हे अतिघाईचे ठरेल : युरी आलेमाव

मडगाव :  विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे राज्यातील लोकांना वाटत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी अद्यापही दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांबाबत काही विधान करणे अतिघाईचे ठरेल, असे मत विरोधी पक्षनेते तथा आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले. 

 विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रसारमाध्यमांनी युतीबाबत केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निवडणुकांना वेळ असल्याने युतीबाबत बोलण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगितले. युरी म्हणाले की, राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाला राज्यात जास्तीत जास्त बळकटी द्यायची आहे, कार्यकर्त्यांची संख्या वाढवायची आहे. काँग्रेस पक्षाकडून ज्याठिकाणी पक्षाचा पाया मजबूत आहे त्याठिकाणी तशीच स्थिती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय सहा ते आठ महिन्यांआधीच घेतलेला आहे. अनेक लोक काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत.

सध्याच्या स्थितीत गोमंतकीय जनतेला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र राहावे असे वाटत आहे. मात्र, विधानसभा अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्ष एकत्रितपणे पुढे येत लोकांचे प्रश्न मांडतील. हे लोकांच्या, राज्याच्या हितासाठी केले जात आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राज्याच्या भल्याचा विचार करत आपण सर्व विरोधी पक्षांना एकत्रित ठेवणार याचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा