पणजी : ताळगाव येथे रस्त्याशेजारी पार्क चारचाकीला दुचाकीची धडक

दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडली घटना.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
पणजी : ताळगाव येथे रस्त्याशेजारी पार्क चारचाकीला दुचाकीची धडक

पणजी : राज्यात शिगमोत्सवाची धूम सुरू आहे. काल राज्य आणि पर्यायाने देशभरात धूळवड साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी किरकोळ अपघात घडल्याचेही समोर आले. दरम्यान काल पणजीतील ताळगाव भागात अशीच घटना घडली. रस्त्या शेजारी पार्क केलेल्या चारचाकीला येथून जाणाऱ्या एका दुचाकीची जोरदार धडक बसली. 

या घटनेत, दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याचे समोर आले असून, त्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हाती आलेल्या महितीनुसार, दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर घटना घडली.  


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा