गोवा : खासगी कार्यक्रमातील लाऊडस्पीकरसाठी ३ हजार ते ५ हजार रूपयांपर्यंत शुल्क

पर्यावरण व हवामान बदल संचालनालयाने शुल्क निश्चित करणारी अधिसूचना जारी केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा : खासगी कार्यक्रमातील लाऊडस्पीकरसाठी ३ हजार ते ५ हजार रूपयांपर्यंत शुल्क

पणजी :  कार्यक्रमाच्या आठवडा अगोदर खासगी कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर लावायचा असल्यास त्यासाठी ३ हजार ते ५ हजार रूपयांपर्यंत परवाना शुल्क भरावे लागणार आहे. पर्यावरण व हवामान बदल संचालनालयाने शुल्क निश्चित करणारी अधिसूचना जारी केली आहे. 

तर व्यावसायिक कार्यक्रमासाठी आठवडा अगोदर ऑनलाईन स्वरूपात अर्ज केल्यास १५ हजार ते २१ हजार रूपयांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे. मात्र सरकारी, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमातील लाऊडस्पीकरसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

खासगी कार्यक्रमासाठी ७ दिवस अगोदर अर्ज केल्यास ३ हजार रूपये तर ३ ते ७ दिवसांपर्यंत अर्ज केल्यास ४ हजार रूपये शुल्क आकारण्यात येईल. कार्यक्रमाच्या ३ दिवस अगोदर अर्ज केल्यास ५ हजार रूपयांचे शुल्क आकारण्यात येईल.

व्यावसायिक कार्यक्रमासाठी ७ दिवस अगोदर अर्ज केल्यास १५ हजार रूपयांचे शुल्क भरावे लागेल. ३ ते ७ दिवसांपर्यंत अर्ज केल्यास १८ हजार रूपये तर ३ दिवस अगोदर अर्ज केल्यास २१ हजार रूपये शुल्क भरावे लागेल. बार, रेस्टॉरंट क्लब्स व इतरांनी ३ वर्षांपर्यंत संगीत / लाऊडस्पीकरसाठी ज्यांनी परवाने घेतले आहेत, त्यांना हे दर लागू होणार नाहीत.

हेही वाचा