सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
पणजी : खानयाळे येथील गावकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तिलारी धरणाजवळील दगडखाणी तात्पुरती थांबवण्याचे आदेश दिलेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तिलारी धरणाजवळील दगडखाणी आणि क्रशिंग युनिट्स तसेच वाहतूक तात्पुरती थांबवण्याचे निर्देश जारी केले आहेत. खानयाळे ग्रामस्थांनी परिसरात सुरू असलेल्या खाणकामांवर चिंता व्यक्त करत साखळी निषेध केला होता.
मर्यादित कालावधीच्या गौण खनिज उत्खनन परवानग्या वापरून पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात अशा काळा दगड खाणपट्ट्यात सुमारे सात युनिट्स कार्यरत होत्या. येथे अविरत आणि अमर्यादित पद्धतीने सुरू असलेल्या खाणकामांमुळे तिलारी धरणावर तसेच येथे असलेल्या एकूणच गावांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ११ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
बातमी अपडेट होत आहे.