गुवाहाटी : आसाममधील देहिंग पटकाई राष्ट्रीय उद्यानातील कॅमेरा ट्रॅपमध्ये प्रथमच ‘क्लाउडेड लेपर्ड’ (Neofelis nebulosa) कैद झाला आहे. आययूसीएन रेड लिस्टनुसार ही प्रजाती ‘असुरक्षित’ (Vulnerable) श्रेणीत वर्गीकृत आहे.
अत्यंत लाजाळू आणि दुर्मिळ समजला जाणारा हा प्राणी पूर्व हिमालय, ईशान्य भारत आणि दक्षिण आशियातील दाट जंगलांमध्ये आढळतो. या महत्त्वपूर्ण शोधामुळे उद्यानातील समृद्ध जैवविविधता अधोरेखित झाली आहे तसेच वनसंवर्धनाच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळणार आहे.
✅ वैज्ञानिक नाव: Neofelis nebulosa
✅ IUCN दर्जा: ‘असुरक्षित’ (Vulnerable)
✅ आधिवास: पूर्व हिमालय, ईशान्य भारत, दक्षिण आशिया आणि चीनच्या काही भागांतील दाट जंगल
✅ विशेषता:
◉ अंगावर ढगांसारखी ठिपक्यांची नक्षी असल्यामुळे “क्लाउडेड” (ढगासारखा) लेपर्ड असे नाव
आसाममधील देहिंग पटकाई राष्ट्रीय उद्यान, जे पूर्वेचे अमेझॉन म्हणून ओळखले जाते, हे राज्यातील एकमेव पावसाळी वन आहे. या उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलात हत्ती, गवा, हॉर्नबिल्स आणि पँगोलिन यांसारखे अनेक दुर्मिळ वन्यजीव आढळतात.
गेल्या महिन्यात, आसामचे मंत्री चंद्र मोहन पटोवारी यांनी आणखी एक महत्त्वाची संवर्धनाशी संबंधित बातमी शेअर केली. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये फोटोसह लिहिले, आमच्या कॅमेरा ट्रॅपने देहिंग पटकाई राष्ट्रीय उद्यानात अत्यंत दुर्मिळ ‘मार्बल्ड कॅट’चे (Pardofelis marmorata) दर्शन घेतले.