पर्रीकरांनी सुरू केलेले विकास कार्य सरकारतर्फे सुरूच राहणार !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मान्यवरांनी वाहिली पर्रीकरांना आदरांजली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
पर्रीकरांनी सुरू केलेले विकास कार्य सरकारतर्फे सुरूच राहणार !

पणजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुआरी पूल तसेच पर्रीकरांनी सुरू केलेले इतर अनेक प्रकल्प सरकारने पूर्ण केले आहे. गोव्याचा विकास पुढील काळातही सुरूच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मिरामार येथील स्मृती स्थळावर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, स्व. पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर, मुख्य सचिव डॉ. वी. कांडावेलू व इतरांनी आदरांजली वाहिली.

 

स्व. मनोहर पर्रीकर यांचे प्रशासन सक्षम व पारदर्शक होते. आधुनिक गोव्याचे शिल्पकार असा त्यांचा उल्लेख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. त्यांनी सुरू केलेले विकासाचे कार्य सरकारतर्फे सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पर्रीकरांचे गोव्याच्या जडणघडणीत योगदान
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव घेतल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पर्रीकर यांचा आदर्श घेऊन भावी पिढी देखील गोव्याच्या जडणघडणीत योगदान देईल, असे मत प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी मांडले.


वडिलांच्या मार्गदर्शनाच्या आधारेच वाटचाल : उत्पल 

माझे वडील मनोहर पर्रीकर यांची आठवण झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. त्यांच्याकडून मी जे काही शिकलेलो आहे, त्या आधारे जीवनात माझी वाटचाल सुरू आहे. आजचा दिवस हा राजकीय भाष्य करण्याचा दिवस नसल्याचे पुत्र उत्पल पर्रीकर म्हणाले.