म्हापसा : हुंड्यासाठी छळ करत असल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती, सासू, सासरे व नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये पती सिद्दिक अकबर शाह, सासू फरिदा खातून, सासरा शागीर अहमद शाह व नणंद चांदणी शाह (कोलवाळ) यांचा समावेश आहे.
हा हुंड्यासाठी छळाचा प्रकार ८ मार्च ते मे २०२४ मध्ये घडला होता. फिर्यादी महिलेचा विवाह झाल्यापासून वरील दोन महिन्यात पतीसह घरच्यांनी छळ चालवला होता. हुंडा म्हणून माहेरून ३ लाख रुपये रक्कम आणण्यासाठी ही छळणूक चालली होती, असा आरोप महिलेने केला.
या छळाला कंटाळून पीडिता डिचोली येथील आपल्या माहेरी निघून गेली व नंतर कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जवळपास वर्षभरानंतर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या ४९८ (अ) व ३४ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.