ज्युनियर स्टेनोग्राफर, एलडीसी परीक्षांचे ठिकाण जाहीर

उत्तर आणि दक्षिण गोव्यात दोन्ही पदांसाठी २३ रोजी परीक्षा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
ज्युनियर स्टेनोग्राफर, एलडीसी परीक्षांचे ठिकाण जाहीर

पणजी : कर्मचारी भरती आयोगामार्फत कनिष्ठ स्टेनोग्राफर तसेच एलडीसी पदांसाठी सीबीटी परीक्षा केंद्रांची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. दोन्ही पदांसाठीची परीक्षा रविवार, २३ मार्च रोजी होणार आहे.
ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठी पहिली परीक्षा (सीबीटी-२) उत्तर गोव्यात दोन ठिकाणी, तर दक्षिण गोव्यातही दोन ठिकाणी घेतली जाणार आहे. उत्तर गोव्यात सदर परीक्षा आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड डिझायन (आसगाव) आणि सेंट झेवियर्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (म्हापसा) येथे घेतली जाईल. दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (फतोर्डा) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कुंकळ्ळी) येथे ही परीक्षा घेतली जाईल. सकाळी ९.१५ ते १०.३० या वेळेत ही परीक्षा होईल. ६० गुणांच्या पेपरसाठी ७५ मिनिटे वेळ मर्यादा असेल. उमेदवारांनी सकाळी ८.३० ते ९ या दरम्यान परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आयोगाने कळविले आहे.
एलडीसी पदांसाठी दुसरी परीक्षा, सीबीटी-३, पाच ठिकाणी घेतली जाईल. उत्तर गोव्यात ही परीक्षा आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड डिझायन (आसगाव) आणि सेंट झेवियर्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (म्हापसा) येथे घेतली जाईल. तर द. गोव्यात, ही परीक्षा डॉन बॉस्को कॉलेज ऑन इंजिनिअरिंग (फतोर्डा), रोझरी कॉलेज (न्हावेली) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कुंकळ्ळी) येथे घेतली जाईल. सदर परीक्षा सकाळी ११.३० ते १२.४५ या वेळेत होईल. उमेदवारांनी सकाळी १०.४५ ते ११.१५ पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र, अन्य माहिती वेबसाईटवर उपलब्ध
आयोगाने एलडीसी पदासाठी सीबीटी-३ परीक्षेसाठी पात्रता यादी आधीच जाहीर केली आहे. आयोगाने सीबीटी-२ परीक्षेच्या निकालांवर आधारित पात्रता यादी तयार केली आहे. प्रवेशपत्र तसेच इतर माहिती आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.‍