घरच्यांना न सांगता उत्तरप्रदेश येथून पळून आली १४ वर्षीय मुलगी

कोकण रेल्वे पोलिसांकडून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
घरच्यांना न सांगता उत्तरप्रदेश येथून पळून आली १४ वर्षीय मुलगी

मडगाव : उत्तरप्रदेश येथून घरातून पळून आलेली १४ वर्षीय मुलगी कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वेस्थानक परिसरात आढळून आली. कोकण रेल्वे पोलिसांकडून सदर मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोकण रेल्वे पोलिसांकडून मडगाव रेल्वेस्थानकावर गस्त घातली जात असताना अल्पवयीन मुलगी फिरताना आढळून आली. पोलिसांकडून सदर मुलीची चौकशी करण्यात आली असता योग्य उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर सखोल चौकशी केली असता सदर मुलगी कुटुंबीयांना न सांगता घरातून पळून आल्याचे पोलिसांना सांगितले. कोकण रेल्वे पोलिसांकडून आवश्यक ती कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करत सदर मुलीला निवारा केंद्रात पाठवण्यात आले असून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

हेही वाचा