आयएसएल : फातोर्डा नेहरू स्टेडियमवर आज सामना
फातोर्डा : इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२४-२५ मध्ये एफसी गोवाचा त्यांच्या फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम या घरच्या मैदानावर गुरुवारी सायं. ७:३० वा. ओडिशा एफसीविरुद्ध सामना खेळणार आहे. ओडिशा एफसी संघ आयएसएलच्या इतिहासात प्रथमच एफसी गोवावर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
दरम्यान, एफसी गोवा आयएसएलमध्ये १८ सामन्यांत नऊ विजय, सहा अनिर्णित आणि तीन पराभवांसह ३३ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर ओडिशा एफसी १८ सामन्यांत सहा विजय, सात अनिर्णित आणि पाच पराभवांसह २५ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. ओडिशा एफसीने त्यांच्या शेवटच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध घरच्या मैदानावर २-२ अशी बरोबरी साधली होती आणि त्याआधी त्यांनी बेंगळुरू एफसीचा ३-२ असा पराभव केला होता, त्यामुळे त्यांना लय सापडण्याची शक्यता आहे.
आयएसएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ११ सामने झाले आहेत. एफसी गोवाने सात वेळा विजय मिळवला आहे आणि चार सामने अनिर्णित राहिले आहेत. या सामन्यात सरासरी ३.२७ गोल झाले आहेत. गौर्सने ओडिशा एफसीविरुद्धच्या तिन्ही घरच्या मैदानावर सामने जिंकले आहेत. त्यांनी प्रत्येकी तीन गोल केले आहेत. ओडिशा एफसीचे ३६ गोल या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च गोल आहेत, ज्यामध्ये दिएगो मॉरिसियो, जेरी माविहमिंगथांगा आणि मोरतादा फॉल यांनी अनुक्रमे ९, ५ आणि ४ गोल केले आहेत. मोरतादाने या हंगामात २१ ब्लॉक्सची नोंद केली आहे, ज्यामुळे तो २० पेक्षा जास्त ब्लॉक्स असलेला अॅलेक्स साजी नंतर दुसरा खेळाडू बनला आहे.
एफसी गोवाचे स्पॅनिश मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ म्हणाले, आम्हाला मागील सामन्यांप्रमाणे स्पर्धात्मक राहण्याची गरज आहे. जमशेदपूर एफसीकडून ३-१ असा पराभव झाल्यानंतर एफसी गोवाला फॉर्म परत मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले. ते म्हणाले, आम्हाला जसे खेळत आहोत तसेच खेळावे लागेल आणि मागील सामन्यांप्रमाणेच स्पर्धात्मक राहावे लागेल.
‘या’ प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर मदार
* एफसी गोवाच्या ब्रेसन फर्नांडिसने या हंगामात आठ गोलचे योगदान दिले आहे (६ गोल, २ असिस्ट) परंतु गेल्या पाच सामन्यांमध्ये त्याला फक्त एकदाच गोल करण्यात यश आले आहे.
* ओडिशा एफसीचा अहमद जहौह त्याचा १५० वा आयएसएल सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला परदेशी खेळाडू असेल.