सूर्यकुमार यादवची संघात एन्ट्री, पृथ्वी शॉ पुन्हा एकदा संघातून दूर

भारत-इंग्लंड वन डे मालिकेसाठी भारतीय संघ नागपूरात दाखल

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th February, 09:48 am
सूर्यकुमार यादवची संघात एन्ट्री, पृथ्वी शॉ पुन्हा एकदा संघातून दूर

मुंबईः मुंबई क्रिकेट असोसिएशनने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठीच्या संघाची घोषणा केली. हरियाणाविरुद्धच्या लढतीसाठी निवडलेल्या १८ सदस्यीय संघात काही बदल पाहायला मिळाले आहेत. 

मेघालयविरुद्ध खेळलेल्या मुंबईच्या संघात तीन बदल पाहायला मिळणार आहेत. श्रेयस गुरवच्या जागी हर्ष तन्नाची निवड झाली आहे, तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोन अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमारची मुंबईच्या संघात एन्ट्री झाली आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने ४-१ अशा फरकाने इंग्लंडवर विजय मिळवला. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सोमवारीच नागपूरात दाखल झाला आहे.

मुशीर आणि सर्फराज हे दोघेही दुखापतग्रस्त झाले आहेत. अय्यर वन डे मालिका खेळण्यासाठी टीम इंडियासोबत नागपूरला दाखल झाला आहे. आयुष म्हात्रे व अमोघ भटकळ ही जोडी सलामीसाठी उपलब्ध आहे. 

परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुन्हा एकदा पृथ्वी शॉ याला दूर ठेवले आहे. विजय हजारे ट्रॉफीदरम्यान गैरवर्तवणुक करणाऱ्या पृथ्वीला संघाबाहेर केले गेले होते.